रत्नागिरी:-हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरीत गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात आली. यात्रेला अपूर्व प्रतिसाद मिळाला.श्री देव भैरी जुगाई नवलाई पावणाई तृणबिंदुकेश्वर संस्था आणि श्री पतितपावन मंदिर संस्था यांनी ही ‘ग्राममंदिर ते समाजमंदिर’ अशी स्वागतयात्रा आयोजित केली होती.
रत्नागिरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरी मंदिरातून आणि शहरातील मारुती मंदिरातून अशा दोन ठिकाणांवरून निघालेल्या स्वागतयात्रा जयस्तंभ येथे एकत्र आल्या आणि तेथून त्या श्री पतितपावन मंदिराकडे गेल्या. वेगवेगळे संदेश देणारे विविध संस्थांचे चित्ररथ, तसेच लहान मुलांसह विविध वयोगटांमधील स्त्री-पुरुष अनेक देवदेवतांच्या आणि पारंपरिक पोषाखांमध्ये या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.
रत्नागिरीत नववर्ष स्वागत यात्रा अपूर्व उत्साहात
