लांजा : तालुक्यातील निवसर बाग येथील काजळी नदीपात्रात ६७ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना शुक्रवारी २८ मार्च रोजी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबतची खबर रेहाना रमजान हाज्जु (वय ४०, रा.निवसर बाग, ता. लांजा) यांनी लांजा पोलिसांना दिली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहाना हाजू या शुक्रवारी २८ मार्च रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास काजळी नदीवर चटई धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांना नदीच्या पाण्यात एका पुरुष जातीचे प्रेत उघडे आणि कुजलेल्या स्थितीत आढळून आले. याबाबत पोलीसांनी माहिती घेतली असता सदरचा मृतदेह हा सुभाष काशीराम राणे (वय ६७, रा.कल्याण-ठाणे, मुळ राहणार वाघेरी, ता.कणकवली, जि.सिंधुदुर्ग) यांचा असल्याचे उघड झाले.
या घटनेप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल नासिर नावळेकर हे करत आहेत.
लांजा : काजळी नदीत आढळला ६७ वर्षीय वृद्धाचा मृतदेह
