नितिश खानविलकर/पाचल:– जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा रायपाटण नंबर १ मधील कु. श्रीपाद विठोबा चव्हाण आणि कु. ऋग्वेद सुनील शेट्ये या दोन्ही ५ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. त्यांच्या यशामागे शाळेतील वर्ग शिक्षिका व मुख्याध्यापिका सौ. नीलम थरवळ व विद्यार्थ्यांचे पालक श्री. विठोबा चव्हाण, सौ. अनघा चव्हाण, श्री. सुनील व सौ. रिया शेट्ये यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचेही त्यांना मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या यशाबद्दल शाळेतील शिक्षक श्री. सुनील भांडेकर, सौ. तांबे, सौ. धावडे, तसेच व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. किशोर गुरव, रायपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. दामोदर लिंगायत, लिपिक व माजी सरपंच श्री. संदीप कोलते, पालक, ग्रामस्थ आणि केंद्रप्रमुख यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. रायपाटण केंद्र व पाचल बीट मधूनही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे.