खेड:- तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन युवतीचा विनयभंग करत ब्लॅकमेल केल्याप्रकरणी रोशन धोत्रे (२८, रा. अलसुरे-बौद्धवाडी, खेड), सुरज सुरेश पाटील (१८, रा. भोस्ते खेड) या दोघांना येथील पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. दोघांनाही गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता संशयिताची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. ही घटना फेब्रुवारी २०२४ पासून आजतागायत घडल्याचे पीडित युवतीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
पीडित युवतीशी ओळख झाल्यानंतर वर्षभरापासून त्यांचे बोलणे व गाठीभेटी सुरू होत्या. यादरम्यान, दोघांनीही विनयभंग करत अश्लिल वर्तन केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या बाबत बुधवारी सायंकाळच्या सुमारास पीडित युवतीने रितसर तक्रार दाखल केली. या प्रकरणी दोघांवर विनयभंगासह ब्लॅकमेल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत रात्री उशिरा दोघांवर येथील पोलिसांनी अटकेची कारवाई केली. या दोन्हीं संशयितांचे मोबाईलही पोलिसांनी जप्त केल्याचे समजते. अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीनं भोयर करत आहेत.