रत्नागिरी:- शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी येथे श्री. दत्ताराम धावडे यांना दि.१५/०३/२०२५ रोजी रात्री १०.३० वा. दरम्यान अतिदक्षता विभाग मध्ये पोटदुखी व पोटाचा घेर वाढून त्रास होत होता म्हणून दाखल करण्यात आले. सदर रुग्णाच्या पोटाच्या टेस्ट केल्या असता त्वरीत शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनात आले तसेच सदर रुग्णास उच्चरक्तदाब व मधुमेहाचा त्रास असल्याने शस्त्रक्रिया करणे अधिक जोखमीचे ठरणार होते. अशावेळी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी मधील डॉ. मनोहर कदम (जनरल ,लेप्रोस्कोपी अँड एंडोस्कोपीक सर्जन) विभागप्रमुख शल्यचिकिस्ताशास्त्र विभाग यांनी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी चे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधिक्षक डॉ. विनोद सांगवीकर, भूलतज्ज्ञ डॉ. विनोद कानगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सदर अतिशय गुंतागुंतीची आतड्यांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडून रुग्णाचे प्राण वाचवले. सदर रुग्ण श्री.गावडे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.