रत्नागिरी:- रत्नागिरी पोलिसांनी तालुक्यातील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्याच्यादृष्टीने पावले उचलली आहेत. त्यासाठी अमली पदार्थ, गंभीर गुन्हे असलेले, दहशत निर्माण करणाऱ्या तब्बल १६ गुन्हेगारांविरुद्ध पोलिस अधीक्षकांनी २ वर्षांपूर्वी हद्दपारीचे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत. त्यापैकी पाचजणांना हद्दपार केले आहे. रत्नागिरी प्रांतांधिकाऱ्यांकडे हद्दपारीचे प्रस्ताव सादर केले आहेत. यापैकी पाचकुडे, सोलकर, शहा, पावसकर, म्हसकर या पाचजणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.