कणकवलीः कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्या ठाणे, दादर रेल्वेस्थांनकापर्यत धावणार आहेत. हा बदल येत्या ३१ मार्चपर्यत आहे. मुंबई सीएसएमटी येथे प्लॅटफॉर्म क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणाच्या कामामुळे ठाणे आणि दादर स्थानकावर काही गाड्यांचा शॉर्ट टर्मिनेशन वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
ट्रेन क्रमांक १२१३४ मंगळुरू जंक्शन ते मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस ठाणे स्थानकावर शॉर्ट टर्मिनेशन करण्यात येईल. ट्रेन क्रमांक २२१२० मडगाव जंक्शन ते मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेस दादर स्थानकावर शॉर्ट टर्मिनेशन करण्यात येईल. ट्रेन क्रमांक १२०५२ मडगाव जंक्शन ते मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेस दादर स्थानकावर शॉर्ट टर्मिनेशन करण्यात येईल.