रत्नागिरी:- मुंबई, पुणे या महानगरापेक्षा रत्नागिरी जिल्ह्यात बांगलादेशीय नागरिकांचे खोट्या दाखल्याचे प्रमाण अधिक आहे.
याबाबत गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, आपण संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. सगळ्यांना अलर्ट केले आहे. ज्या अधिकाऱ्यांच्यामार्फत दाखले दिले जातील त्यांना निलंबित केले जाईल. हा आपल्या देशासाठी घातक विषय असल्यामुळे इथे कुणाचीही गय केली जाणार नाही.
सभागृहात बोलताना आमदार भास्कर जाधव म्हणाले, घुसखोर बांगलादेशी संदर्भात गृहराज्यमंत्री माहीती देत आहेत. त्याविषयी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित करावयाचा आहे. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी एक मोहम्मद इदरीस शेख नावाच्या बांगलादेशी नागरिकाला रत्नागिरीच्या पोलिसांनी मुंबईमध्ये अटक केली. मुंबईमधून अटक करून रत्नागिरीमध्ये घेऊन गेले. त्या मोहम्मद इद्रीस शेखला इथला रहिवासाचा दाखला हा शिरगांव ग्रामपंचायतीने दिला.
शिरगाव ग्रामपंचायतीने तसा दाखला दिल्यानंतर हा जो बांगलादेशी नागरिक आहे, त्याचा जन्म दाखला चिपळूणमध्ये मिळाला. हा सगळा प्रकार किंवा हा सगळा तपास हा सीआयडीकडे वर्ग केला गेला. म्हणून सीआयडीकडे वर्ग केलेले या तपासाची आपल्याला काय माहिती आहे का? ती माहिती आली असेल तर आपण देऊ शकाल का? आता जर आपल्याकडे नसेल तर ते आपण पटलावर ठेवाल का? असा सवाल केला.
‘तिने’ बिलालशी लग्न केले.
आता स्थानिक माणसाबरोबर लग्न केल्यामुळे ती आता येथील रहिवासी झाली. ती रहिवासी झाल्यामुळे ती सुद्धा दाखला अशा पद्धतीने चिपळूणमधूनच घेऊन गेलेली आहे. गुहागर नजीकच्या तळीवर सुद्धा अशाच पद्धतीने बांगलादेशी रहिवासी मिळाला आहे. ग्रामीण भागामध्ये छोट्या भागामध्ये हे बांगलादेशी नागरिक मिळतात या नागरिकांचीशोध मोहीम स्वतंत्रपणे घ्याल का, अशी पृच्छा केली. यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, आपण संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. ग्रामसेवकावर कारवाई केलेली आहे. अशा पद्धतीचे दाखले न देण्याबाबत महसूल विभागाला सूचना केल्या आहेत.