प्रशांत पवार / राजापूर : तालुक्यातील जैतापूर दळे सडेवाडी येथे एका शिक्षकांच्या घरात अज्ञात चोरट्याने डल्ला मारला. यामध्ये 60500 रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी 25 मार्च 2025 रोजी रात्री 10.30 वाजता राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही चोरी 13 मार्च 2025 ते 25 मार्च 2025 या कालावधीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदा महादेव मोरे ( 61, शिक्षक सेवानिवृत्त) हे दळे सडेवाडी येथे राहतात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीने त्यांच्या राहत्या घरात प्रवेश करून मौल्यवान वस्तु, रोख रक्कम, 30000 किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या , 30000 रोख रक्कम, 500 रुपये किमतीचा रेडमी मोबाईल असा एकूण 60500 रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेला.
या प्रकरणी राजापूर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 च्या कलम 331(3),331(4) आणि 3 अंतर्गत अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञाताचा शोध सुरु आहे.