रत्नागिरी:-स्वा. वि. दा. सावरकर यांच्या प्रेरणेने भागोजीशेठ कीर यांनी बांधलेल्या पतितपावन मंदिरात ८० वर्षांनंतर हरिनामाचा गजर होणार आहे.
पतितपावन मंदिरात दर महिन्याच्या शिवरात्रीला वेगवेगळ्या भजनी बुवांच्या माध्यमातून संध्याकाळी भजनाचा गजर होणार आहे.
त्याचा प्रारंभ गुरुवारी, दि. २७ मार्च रोजी रत्नागिरीतील प्रसिद्ध भजनी भरतसूत सुदेशबुवा नागवेकर करणार आहेत. संध्याकाळी ७ वाजता पतितपावन मंदिरात त्यांचे भजन होईल. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहून भजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.