तरवळ/अमित जाधव:- रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेज मधील इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेत असलेला अरिहंत बाबासो बेडक्याळे याची राजापूर तालुक्यातील पडवे येथील जवाहर नवोदय विद्यालयासाठी पुढील शिक्षणासाठी निवड झाली आहे.
सदर निवड परीक्षा ही जानेवारी महिन्यात घेण्यात आली होती आणि या परीक्षेसाठी अरिहंत याने चांगला अभ्यास केला व ही परीक्षा यशस्वी रीत्या उत्तीर्ण झाला आहे.ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्याने कोणत्याही प्रकारचे बाहेरील क्लास लावले नव्हते, स्वतः संपूर्ण अभ्यास करून मेहनत घेऊन आपल्या आई वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्वाची परीक्षा तो उत्तीर्ण झाला आहे. येत्या जून पासून तो राजापूर तालुक्यातील पडवे येथील जवाहर नवोदय विद्यालय या ठिकाणी पुढील शिक्षण घेण्यासाठी जाणार आहे.
या महत्वाच्या परीक्षेमध्ये अरिहंत बाबासो बेडक्याळे याने जे यश मिळविले आहे त्या बद्दल त्याचे बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेज चे मुख्याध्यापक बिपीन परकर पर्यवेक्षक उमेश केळकर तसेच प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. तसेच मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष सुनिल ऊर्फ बंधू मयेकर ,उपाध्यक्ष विवेक परकर ,सचिव विनायक राऊत, खजिनदार संदीप कदम तसेच सर्व संचालक मंडळाने त्याचे कौतुक व अभिनंदन केले व त्याच्या पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अरिहंत बाबासो बेडक्याळे याने जे घवघवीत यश मिळवले आहे त्या बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे व त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, तसेच त्याला भरभरून शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत.