गुहागर : गुहागर विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले उद्धव ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांच्या मतदार संघात आता शिंदेगटाने नवी खेळी खेळली आहे.
श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांची गुहागर विधानसभा मतदार संघाचे समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत विपुल कदम यांचे उमेदवारीसाठी नाव आघाडीवर होते; मात्र रामदास कदमांच्या विरोधामुळे राजेश बेंडल यांना उमेदवारी मिळाली होती. विधानसभेत बेंडल यांचा दारूण पराभव झाला होता. त्यामुळे आता गुहागर मतदार संघात शिवसेनेच्या पुनर्बांधणीसाठी शिंदे गटाकडून भास्कर जाधवांच्या गुहागर मतदार संघात नवी खेळी खेळली जात असल्याचं बोललं जातंय. विपुल कदम गुहागर मतदार संघात सक्रिय आहेत. सध्या गुहागर मतदार संघात ते कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी व समस्या जाणून घेत आहेत.