चिपळूण:- काही दिवसांपूर्वी चिपळूण- गुहागर बायपास मार्गावरील बारदानाच्या गोदामाला आग लागण्याची घटना ताजी असतानाच बुधवारी पिंपळी येथील भंगारच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.या आगीत भंगार गोडावून मालकाचे मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसात वनवा लागण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच चिपळूण- गुहागर बायपास मार्गावरील बारदानाच्या गोदामाला वणव्यामुळे आग लागण्याच्या घटना घडल्याचे समोर आले होते. या आगीत बारदान गोदाम मालकाचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना ताजी असतानाच बुधवारी पिंपळी येथील भंगारच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या गोडाऊन मध्ये प्लास्टिकचे साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आगीच्या ज्वाळा व धूर वाढल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती येथील ग्रामस्थांनी अग्निशामक दलाला दिली. यानंतर अग्निशमन दलाच्या तीन बंबाकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र, तोपर्यंत भंगार गोडाऊन मधील साहित्य जळून खाक झाले. या आगीचे कारण समोर आलेले नाही.