मंडणगड:-यशतेज फाऊंडेशन मंडणगड यांच्या माध्यमातून शहरातील नागरीकांनी 25 मार्च 2025 रोजी वेळास येथे ऑलिव्ह रिडेल कासवांचा जन्मसोहळा अनुभविला. (25) रोजी वेळास समुद्री किनारी हँचरीत सुरक्षीत करण्यात आलेल्या अंड्यातील 34 पिल्ले अंड्यातून बाहेर पडली.
त्यांना समुद्र किनारी सुखरुप सोडण्यात आले. जन्म झाल्यावर या किनाऱ्यावर कधीही परत न येण्याचा व जन्मभूमीपासून दूर जाण्याचा या 34 जीवांचा सुरु झालेल्या अनोख्या प्रवासाचे साक्षीदार होण्याचा मान शहरातील अनेक नागरीकांना मिळाला.
त्यांना कासव मित्र मोहन उपाध्ये यांनी ऑलिव्ह रीडले जातीच्या कासवांसह कासव या विषयाची सखोल माहीती दिली. पहाटे साडेचार वाजता शहरातून दाखल झालेल्या नागरीकांनी सुर्योदयांचे वेळी वेळास सुमुद्र किनारी हा जन्मसोहळा प्रत्यक्ष अनुभवला. कासवांचे गाव म्हणून प्रसिध्द असलेल्या वेळास या गावी कासव विणीचे हंगामास सुरुवात झाली आहे. यंदा वेळास येथे समुद्र किनाऱ्यावर 32 घरटयामध्ये 3579 अंडी सुरक्षीत करण्यात आली आहेत व कासव अंड्यातून बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या कासवांचा जन्मसोहळा पाहण्यासाठी पर्यटक व अभ्यासकांसाठी अंड्यातून पिल्ले केव्हा बाहेर पडतील त्याची माहीती स्थानीक व कासव मित्राकडून प्राप्त होत आहे. त्यानुसार वेळास गावात पर्यटक अभ्यासकांची गर्दी वाढत आहे. या पुढील काळात लवकरच विणीचे गणीताने कासव महोत्सवाची तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. कला क्रीडा संस्कृती इत्याही विषयांचा समाजपयोगी काम करण्याच्या उद्देशाने अँड. यश घोसाळकर यांनी पुढाकार घेऊन सुरु केलेले यशतेज फाऊंडेशनने आम्हाला जीवनातील सर्वात वेगळा क्षण अनुभवण्याची संधी दिलेली असल्याची अनेकांनी या कार्यक्रमानंतर सांगीतले.
यशतेज फाऊंडेशन विद्यार्थी युवक महिला खेळाडू वाचक अशा विविध समाज घटकासाठी काम करुन येथील समाज जीवनावर चांगला प्रभाव टाकत आहे. सकारात्मक विचारांचा समाजात प्रभाव वाढवून विविध विषयावर चर्चा सत्र वाचनालय अभ्यासीका महिलांचा सत्कार खेळाच्या स्पर्धा, महापुरुषांच्या जयंती निमीत्त वैचारीक प्रबोधनाचे कामही करत आहे.