खेड:- खेड-वडगाव मार्गावरील खालची हुंबरी येथे इर्टिका गाडी चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक देऊन केलेल्या अपघातात ३० वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी कार चालकावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात ९ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास झाला होता. स्वप्नील अनिल लाड, वय २८ वर्षे. रा. तळे सात्विणवाडी. ता. खेड असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर या अपघातात संकेत प्रदिप कदम, वय-३० वर्षे, रा. हुंबरी, ता. खेड याचा मृत्यू झाला आहे. स्प्लेंडर मोटार सायकल क्रमांक एम.एच.१२/डी.के./ ६२२९ आणि इर्टिका गाडी क्रमांक एम.एच. ०८/ए.एक्स/ ६०२४ या दोन वाहनांमध्ये अपघात झाला होता. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता.