खेड:-मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाट उतरत असतानाच गतीरोधकाजवळ तीन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातप्रकरणी टँकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश्वर शनप्पा मंगलगी (वय-२६, रा. गुब्बेवाड, ता. सिंदगी, जि. बिजापूर, राज्य कर्नाटक) असे त्या गुन्हा दाखल झालेल्या टँकर चालकाचे नाव आहे. हा अपघात २३ मार्च २०२५ रोजी सकाळी १०:४५ वाजताच्या दरम्यान घडला होता.
जागृती सुर्वे, शोभा सदानंद कदम, संस्कृती संतोष कदम व मयुरेश कदम (सर्व रा. वृंदावन सोसायटी, ठाणे पश्चिम, मूळ रा. कोकरे वाघशिबीवाडी, ता. चिपळूण) अशी अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत.
इरटीगा कारचालक वैभव शिवाजी सुर्वे (४०, वृंदावन सोसायरी ठाणे पश्चिम, मूळ रा. कोकरे वाघशिबीवाडी, ता. चिपळूण) यांनी यासंबंधी तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.