गुहागर : चिपळण ते बोऱ्याफाटा रोडवर ०५ जनेवरी रोजी सायंकाळी ०७.००या. चे सुमारास दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात तनिष सधिर धोपावकर (21, रा. वेळणेश्वर ता. गुहागर ) हा जखमी झाला. त्याच्या दुखपतिस व स्वत:च्या दुखापतीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी केतन दत्ताराम तांडेल (रा. वेळणेश्वर ता. गुहागर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्यादी तनिष सुधिर धोपावकर यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दिली.
सविस्तर वृत्त असे की, केतन दत्ताराम तांडेल हा आपले ताब्यातील ज्युपिटर गाडी टुव्हिलर ( MH-08-BF- १३५४) वरुन पाठीमागे तनिष सधिर धोपावकर याला बसवून चिपळण रेल्वेस्टेशन ते मार्गताम्हाणे बोऱ्याफाटा रोडने वेळणेश्वर येथे जात असताना गाडी वळणात आलेवेळी ज्युपिटर गाडी स्लिप होवुन अपघात झाला. अपघातात दुचाकीस्वार केतन याचे स्वताःचे दुखापतीस तसेच पाठीमागे बसलेले तनिष यांना अपघातात कपाळाला तसेच पाठीचे मणक्याला गंभीर दखापत होवन अपघात केला. या अपघटप्रकरणी केतन याच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम. २८१, १२५(क), १२५ (ख), मोटार वाहन कायदा १८४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.