राजन लाड / जैतापूर:- तालुक्यातील राजापूर दळे येथील काझी मलिपर्पज हॉल येथे त्रिवेणी संघाच्या महिलांनी औक्षण करून पुष्पहार घालत तसेच पुष्पवृष्टीसह ग्रामस्थांनी ७४ सायकलिस्टांचे स्वागत केले.
‘सुरक्षित तट, समृद्ध भारत’ ही सायकल मोहीम गुजरात येथून ७ मार्च २०२५ रोजी सुरू झाली. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने आयोजित केलेल्या या मोहिमेत ७४ सायकलिस्ट सहभागी झाले आहेत, ज्यामध्ये ७० जवान आणि ४ महिला सायकलिस्टांचा समावेश आहे. देशाच्या किनारपट्टी भागातील सुरक्षा आणि समृद्धीचा संदेश पोहोचवण्यासाठी ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे. आज या मोहिमेचा मार्ग सागरी महामार्गावरिल जैतापूर दळे येथे स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला होता.
या सायकल मोहिमेच्या स्वागतासाठी त्रिवेणी संघाच्या बहुसंख्य महिला नागरिक आणि सायकलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “ही मोहीम देशाच्या सुरक्षेचा आणि एकतेचा संदेश घेऊन आली आहे. त्यांचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद वाटतं असल्याचे सांगत त्रिवेणी संघाच्या सहसचिव रेशम लाड आणि जैतापूर ग्रामपंचायत सदस्य दिवाकर आडवीरकर यांनी मनोगतातून शुभेच्छा दिल्या .
या जवानांच्या स्वागतासाठी जैतापूर ,दळे येथील बहुसंख्य महिलांसह नागरिक उपस्थित होते .