रत्नागिरी : प्रतिभा इंटर प्रायझेस अंतर्गत कोकण कामधेनु प्रकल्प सुरु करीत असल्याचे सांगून त्यासाठी वेगवेगळ्या उत्पादनांची निर्मिती करणार अहोत असे खोटे सांगुन कापडगाव येथील प्रौढाला 1 लाखाचा गंडा घातल्याची घटना १२ मार्च ते 22 मार्च रोजी घडली. अतुल जयराम कांबळे ( ४२वर्ष, व्यवसाय-विमा प्रतिनिधी, शिक्षण बी.ए, रा.घर.नं.१५-अ, म.पो. कापडगाव) असे फसवणूक झालेल्या प्रौढाचे नाव आहे. याप्रकरणी योगेश प्रकाश सावंत व एक अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल कांबळे यांच्याकडून योगेश सावंत व अन्य एक यांनी प्रतिभा इंटर प्रायझेस अंतर्गत कोकण कामधेनु प्रकल्पासाठी ६०,०००/- एनईएफटी द्वारे ट्रान्सफर करुन घेवुन तसेच फिर्यादी यांचेकडुन त्यांचे घरी कापडगाव येथुन रुपये ४०,०००/- रोख स्वरुपात घेवन अशी एकूण एक लाखाची फसवणूक केली. अतुल जयराम कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.