चिपळूण (प्रतिनिधी) : समता महिला ग्रामसंघ मौजे कुशिवडे गावातील गुरुमाऊली समूह मधील सदस्या सौ. रोहिणी सागर तांदळे यांना CMEGP योजनेअंतर्गत बोलेरो पिकअप देण्यात आली असून त्यांना व्यवसायिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सहकार्य करण्यास आले.
या प्रस्तावासाठी कुशिवडे गावचे मा. सरपंच सिद्धार्थ कदम यांचे लाखमोलाचे सहकार्य व पाठपुराव्यामुळे शक्य झाले. तसेच कुशिवडे गावचे crp सौ.समिक्षा गोसावी यांनी सुद्धा हा प्रस्तावासाठी बँकेत वेळोवेळी पाठपुरावा केला. आपल्या तालुक्याचे तालुका अभियान व्यवस्थापक अमोल काटकर आणि प्रभाग समन्वयक शुभम जाधव यांच्या कामाच्या ऊर्जेमुळे तसेच ग्रामपंचायत कुशिवडे सरपंच सौ.रोशनी डिके, उपसरपंच गुणाजी डिके, सदस्य दिलीप डिके, सौ.सुनिता जाधव यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे महिलांना स्वतःची उपजीविका वाढवण्यास एक सकारात्मक स्फूर्ती मिळते. तसेच आमच्या सर्व तालुका अभियान कक्षाचे व सर्व प्रभाग समन्वयक यांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले.