दापोली:- संस्कार भारती दापोली यांच्यातर्फे आयोजित भव्य चित्रकला प्रदर्शन , दापोलीतील गोपाळकृष्ण सोहनी विद्या मंदिर येथील चैतन्य सभागृह येथे संन्न होत आहे . २३ मार्च २०२५ हे प्रदर्शन सुरु राहणार असून दापोली आणि आसपासच्या परिसरातील सर्व हौशी चित्रकारांची अत्यंत आकर्षक अशी चित्र या चित्रकला प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.
या चित्रपटदर्शनासाठी प्रख्यात लेखक – चित्रकार जितेंद्र पराडकर , निसर्ग चित्रकार विष्णू परीट व चारकोल कलाकार सतीश सोनवडेकर तसेच दापोली शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाचे चेअरमन डॉ. प्रसाद करमरकर आणि मुख्याध्यापक शेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत या भव्य चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन झाले . यावेळी चित्रकथी कलाकार राजश्री पाटणकर , कृषी विद्यापिठाचे निवृत्त प्राध्यापक डॉ.दिपक हर्डीकर आदि मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे जितेंद्र पराडकर आणि चित्रकार राजश्री पाटणकर यांनी या कलाप्रदर्शनाच्या उपक्रमाचे आपल्या मनोगतातून कौतुक केले असे उपक्रम भावी कलाकार घडण्यास नक्कीच मदत करतील असेही त्यांनी आपल्या मनोगतातून नमूद केले . प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर मान्यवरांनी सर्व चित्रांचे अवलोकन केले व अत्यंत मनापासून दाद दिली.
यानंतर याच सभागृहामध्ये निसर्ग चित्रकार विष्णू परिटसर यांचे निसर्गचित्राचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. याला सर्व विद्यार्थी आणि सर्व हौशी चित्रकारांनी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला. याचवेळी एका बाजूला चारकोल कलाकार सतीश सोनवडेकर यांनी अतिशय सुंदर पद्धतीने चारकोलमध्ये लाईव्ह पोर्ट्रेट करून दाखवले, त्यालाही उत्स्फूर्त दाद मिळाली. विद्यार्थ्यांच्या समोर झालेल्या या प्रात्यक्षिकाने सर्व विद्यार्थी तसेच सर्व हौशी चित्रकार भारावून गेले. दापोलीमध्ये अशा पद्धतीचे नाविन्यपूर्ण उपक्रम गेले चार वर्ष सातत्याने संस्कार भारती तर्फे सुरू आहेत आणि दापोलीतील सर्व चित्रकार आपल्या अनोख्या चित्रशैलीने सर्व कलारसिकांचे आणि दापोली वासियांचे मन जिंकून घेत आहेत.
या प्रदर्शनामध्ये दापोली परिसरातील २८ हौशी चित्रकारांची सुमारे १५० च्या वर चित्रे प्रदर्शित केलेली आहेत.यामध्ये जलरंग , ऍक्रालिक, पेन्सिल , चारकोल , पोस्टर रंग इत्यादी माध्यमातून काढलेली निसर्गचित्रे , व्यक्तिचित्रे, स्थिरचित्रे , अमूर्त चित्रे तसेच विविध शैलीतील चित्रप्रकार हाताळले गेले आहेत.
उद्घाटनाच्या दिवसापासूनच दापोलीतील कलाप्रेमी मंडळी या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत आहेत. या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी विद्याधर ताम्हनकर , युवराज पेठे , संजय दळवी तसेच प्रसन्न चिंदे सर शलाका मालू यांनी मेहनत घेतली.
सहभागी चित्रकारां मध्ये संजय दळवी, विद्याधर ताम्हनकर, युवराज पेठे, प्रसन्न चिंदे, प्रशांत निवाते,ए एस.पेटकर, सागवेकर,कु. आर्या लिमये,साइराज भडवळकर, मयुरी झूजम,ऋतिक नामोळे, हेमंत जोशी
विभव गोंधळेकर,नबा मुन्शी,श्रीईशा करंदीकर,डॉ. सौ. राधिका माणकापुरे,सौ. रेखा जेगरकल,अद्विता कस्तुरे, धनश्री,आर्यन कस्तुरे, सौम्या खोचरे,अस्मिता मालू, शलाका मालू, आकांक्षा अस्वले,सौ. राधिका मालू, सृष्टी मालू,निर्मला करवा, सविता उजाळ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्याधर ताम्हनकर यांनी केले.