संगमेश्वर:- संगमेश्वर बसस्थानक व बाजारपेठ येथे वाहतूकीस अडथळा होईल असे वाहन पार्क करणाऱ्या दोन चालकांविरुद्ध संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. समिर यशवंत कोवळे (वय २४) व अली हसन बेबल (वय ५१) अशी संशयित चालकांची नावे आहेत. या घटना मंगळवारी (ता. १८) दुपारी बारा ते साडेबाराच्या सुमारास संगमेश्वर बसस्थानक व बाजारपेठ रस्त्यावर निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित चालक समिर कावळे यांनी मोटार (क्र. एमएच-०६ डब्ल्यू ३८०५) बसस्थानक रस्त्यावर तर अली बेबल यांनी ट्रक (क्र. एमएच-०८ एपी २०३१) वाहन बाजारपेठ येथे वाहतूकीस अडथळा होईल असे वाहन पार्क केले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल उत्तम सासवे आणि महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल साक्षी कामेरकर यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.