प्रवीण कांबळे/लांजा : गुरुवार दि. २० मार्च रोजी महाड चौदारतळे सत्याग्रह दिनाचे औचित्य साधून लांजा तालुका जयंती महोत्सव संस्था आयोजित जिल्हास्तरीय भीम-बुद्ध गीतांवर आधारित कराओके स्पर्धा स्पर्धकांच्या उत्फुर्त प्रतिसादात पार पडली.
स्पर्धेत प्रथम क्रमांक रवींद्र जाधव (भू, ता. राजापूर), द्वितीय क्रमांक जितेंद्र पवार (चाफेरे- रत्नागिरी), तृतीय क्रमांक संतोष चलोदे (उर्मिला माने विद्यालय आसगे) तर उत्तेजनार्थ सुधीर जाधव ( खारेपाटण), विलास कांबळे (कुर्णे) यांनी यश प्राप्त केले. रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबईस्थित असणारे स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेत एकूण बावीस स्पर्धकांना प्रवेश देण्यात आला होता. स्पर्धेची सुरुवात तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्फहार अर्पण करून पंचशील पठणाने झाली. स्पर्धकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात स्पर्धा संपन्न झाली.
लांजा तालुका माता रमाई पतसंस्थेचे अध्यक्ष बबन कांबळे, डॉ. रोहिनील जाधव, विश्वजित कांबळे, प्रदीप पवार, संदेश कांबळे, अशोक कांबळे सुधाकर कांबळे, उज्वल पवार, किशोर कांबळे, रमेश जाधव, प्राजक्ता जावडेकर, संतोष कांबळे, योगेश कांबळे, स्वप्नील जाधव, स्नेहा कांबळे, सत्यशीला कांबळे, योगेश पवार, प्रवीण कांबळे उपस्थित होते. स्पर्धा लांजा शहरातील कुळकर्णी-काळे छात्रालयाच्या सभागृहामध्ये पार पडली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लांजा तालुका जयंती महोत्सव संस्थेच्या सर्व पदाधिकारी , सदस्य यांनी मेहनत घेतली.