राजापूर : तालुक्यातील राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी मर्या. राजापूर मध्ये सभासद सभासद करून घेण्यास टाळाटाळ आणि उद्धट बोलल्याप्रकरणी मनसेचे अमृत तांबडे यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करण्यात आली आहे.
अमृत तांबडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ऑक्टोबर 2024 पासून राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी मर्या. राजापूर येथे मी सभासद होण्यासाठी जात होतो पण तिथले मुख्य कार्यकारी अधिकारी पाटकर यांनी मला टोलवाटोलवी केली. प्रकाश मांडवकर यांना फोन करण्यास सांगितला, प्रकाश मांडवकर यांना फोन केल्यास या महिन्यात 27 तारखेला मिटींग आहे, तेव्हा बघू, तर कधी माझ्या आईचे वर्षश्राध्द आहे. असे मला टोलवा टोलवी 16 जानेवारी 2025 पर्यंत केले. त्यानंतर 16 जानेवारी 2025 रोजी मी पतपेढीशी लेखी पत्रव्यवहार केला असे त्यांचे म्हणणे आहे. अर्जात सभासद करून घेणे 1350/- रुपये व लागणारे दस्ताऐवज त्यांनी आणले होते. त्यानंतरही त्यांनी 15 दिवसात सभासद करून घेतो असे सांगितले. पण तरीही टोलवा टोलवीची उत्तरे व शिवीगाळ करणे तुमचा काही संबंध नाही अशी उत्तरे देण्यात आली. प्रकाश मांडवकर ठरवतील अशी उध्दट उर्मट उत्तरे दिली. असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. ज्यांनी सभासद करून घेण्यास टाळाटाळ केली यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी अमृत तांबडे यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.