गावखडी / वार्ताहर:- रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत रंगपंचमी हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी जि.प.मेर्वी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ.संजया पावसकर, उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर, शिक्षिका सौ.श्रेया रसाळ आणि सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली होती.
रंगपंचमी हा भारतीय सणांपैकी एक सण आहे. भारतीय सणांचे ॠतूमानानुसार फार महत्त्व आहे.रंगपंचमी सण आपण वेगवेगळे रंग घेऊन साजरी करतो याचवेळी निसर्ग सुद्धा रंगांची उधळण करीत असतो.
घरी मुले एकटीच असतात. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत रंगपंचमी उपक्रम राबविण्याबाबत आल्याने मुलांना एकत्रित रंगपंचमीचा आनंद लुटत आला.मज्जा करता आली. एकजुटीचे महत्त्व मुलांना समजते.भारतीय संस्कृतीचे , परंपरांचे जतन केले जाते.
विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्यासाठी जि.प.मेर्वी शाळेत विविध उपक्रम राबविण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शर्वरी करगुटकर, उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर, उपशिक्षिका सौ.संजया पावसकर, शिक्षिका सौ.श्रेया रसाळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.मंगेश म्हादये , उपाध्यक्षा सौ.सुजाता गोठणकर, शिक्षणतज्ञ श्री.संतोष कुरतडकर, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी , शिक्षक पालक संघ, माता पालक संघ पदाधिकारी आणि सर्व पालक बहुमोल परिश्रम घेत असतात.