पाली:- जिल्हा परिषद अंतर्गत झालेल्या रत्नागिरी प्रज्ञाशोध परीक्षेत रत्नागिरी तालुक्याच्या गुणवत्ता यादीत नाणीज गुरववाडी शिवगणवाडी शाळेच्या अनुष्का महेंद्र गावडे या चौथीच्या विद्यार्थिनीने १७२ गुण मिळवत तालुक्याच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तीला प्रशालेचे मुख्याध्यापक विजय पर्वते,शिक्षिका उत्कर्षां गुरव यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १ या शाळेच्या रुषांक विकास रेवाळे या विद्यार्थ्यांने १२६ गुण मिळवत गुणवत्ता यादीत आला आहे. या विद्यार्थ्याला प्रशालेच्या मुख्याध्यापिका स्मिता पाटील,शिक्षक मनोजकुमार खानविलकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, सरपंच विनायक शिवगण,रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रामचंद्र गराटे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नियती गावडे, निशा बेंडल यांनी अभिनंदन केले आहे.