माजी जि. प.अध्यक्ष उदय बने यांची विशेष उपस्थिती
रत्नागिरी – तालुक्याचे शेवटचे गाव असणाऱ्या उक्षी येथे तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उक्षी येथे माजी सरपंच अन्वर गोलंदाज यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे तिथीनुसार शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. या वर्षीही त्याच उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. या जयंतीला बालकलाकारानी छत्रपती शिवराय व मावळे यांची वेशभूषा केली होती.
या शिव जयंतीला प्रमुख वक्ते म्हणून श्री. खातू सर उपस्थित होते. खातु सर यांनी आपल्या उत्कृष्ट भाषा शैलीत शिवाजी महाराजांचा इतिहास डोळ्यांसमोर उभा केला.
माजी जि. प.अध्यक्ष उदय बने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, अन्वर गोलंदाज यांसारखे खरे मावळे प्रत्येक गावा गावात निर्माण झाले पाहिजेत. अन्वर गोलंदाज यांसारख्या व्यक्तींची आज खरच गरज आहे. महाराष्ट्रात जे काही घाणेरडे राजकारण चालले आहे त्याला अन्वर गोलंदाज यांनी शिव जयंती साजरी करून लगावलेली एक चपराक आहे.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अन्वर गोलंदाज, अझर गोलंदाज, तौसिफ गोलंदाज,संतोष देवळेकर, मुबाश्शिर काझी, जुनेद खान,विश्वास यादव, राजेश हळदणकर , विनायक सनगर यांनी विशेष मेहनत घेतली.
या कार्यक्रमाला माजी जि. प.अध्यक्ष उदय बने, विभाग संघटक सुरेश कारकर,आयोजक व माजी सरपंच अन्वर गोलंदाज,माजी सरपंच राजेंद्र देसाई,वांद्री गावचे सरपंच दीपक किंजळे, तंटामुक्त अध्यक्ष राजेश हळदणकर,जेष्ठ शिक्षक मनोहर डांगे सर, उक्षी ग्रामपंचायत सदस्य जुनेद खान,सानिका गराटे, उक्षी शाळेचे शिक्षक विनायक सनगर सर,पोलिस पाटील अनिल जाधव, अन्वी साळवी,ग्रामसंघ अध्यक्षा शीतल यादव, सीआरपी छाया कांबळे,अंगणवाडी सेविका कांचन केळकर तसेच विद्यार्थी आणि पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुझम्मील काझी यांनी केले.
आमच्या उक्षी गावचे माजी सरपंच,धडाडीचे तरुण तड़फदार कार्यकर्ते,समाज सेवक सुस्वभावी,सतत हसत मुख,वेळ प्रसंगी धावून येणारे,सहकार्य करणारे, उद्योगपती,आमच्या सावंतवाड़ी,गुरव वाडी नळ योजनेमधे मोलाचा सहभाग घेऊन प्रत्येकाला पाणी पुरवठा करणारे,लोकांची लहान मोठी कामे करणारे असे गुणवंत आमचे शेजारी आदरणीय अन्वर गोलंदाज यांनी आज श्री छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती उक्षी येथे अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीत साजरी केली शिवाय अनेक मान्यवरांचा आणि मुलांचा सत्कार केला आणि एक आदर्श गावामध्ये निर्माण करून गावाचे नावलौकिक केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे,कृतन्यता व्यक्त करावी,धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहेत.
– दादा गोणबरे, ग्रामस्थ उक्षी