मनीष कदम / रत्नागिरी
समग्र शिक्षा महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रकल्प बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२२ मध्ये ऑनलाइन संशाधने आणि सहकार्याने शिक्षण शिकविण्याची प्रक्रिया समृद्ध करण्यासाठी डिजिटल अध्यापन शास्त्राच्या वापरावर भर दिला आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ३ शाळा व २ गटसाधन केंद्रांमध्ये विद्यार्थी संगणक साक्षर होत आहेत. सध्याचे युग माहिती तंत्रज्ञानाचे असून, सर्वच ठिकाणी संगणकाचा उपयोग होत आहे. डिजिटल इंडियाच्या स्वप्नपूर्तीसाठी शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना संगणक हाताळण्याचे कौशल्य प्राप्त व्हावे, आधुनिक काळात टिकायचे असेल, तर संगणकाशी मैत्री करावी लागेल, त्याला हाताळणे शिकावे लागेल हे उद्देश समोर ठेवून, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने आयसीटी (इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलाजी) हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. प्राथमिक शिक्षण परिषदे अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी मा. श्री बी. एम. कासार सर, मा. श्री. आर. के. कांबळे (सहाय्यक कार्यक्रम अधिकारी समग्र शिक्षा) यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण व प्रोजेक्टरच्या माध्यमातून विज्ञान, इतिहास, भूगोल या प्रात्यक्षिक विषयांचे ऑनलाइन अध्यापन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक परिणामकारक पद्धतीने अध्यापन केले जात आहे. खासगी महागड्या शाळेत दिसणारी संगणक प्रयोगशाळा आता जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये बघायला मिळत आहे. सध्याच्या युगात संगणकाचा उपयोग हा विद्यार्थ्यांना फार महत्त्वाचा मानला जात आहे.
आयसीटी प्रयोगशाळा ठरताहेत वरदान
