नवी दिल्ली:- अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि बुच विल्मोर (Butch Wilmore) अखेर तब्बल ९ महिन्यांनंतर पृथ्वीवर परतले आहेत. त्यांचे फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर यशस्वी लँडिंग झाले.
हे दोघेही इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानाच्या सहाय्याने पृथ्ववर परतल्या आहेत.
सुनीता विलियम्स आणि बॅरी विल्मोर यांना घेऊन पृथ्वीवर परतलेले ड्रॅगन कॅप्सूल रिकव्हरी जहाजावर लोड करण्यात आले आहे. यानंतर आता एक-एक करून परतलेल्या सर्व चारही अंतराळ विरांना बाहेर काढले जाईल आणि त्यांची वैद्यकीय तपासणीही केली जाईल
यासंदर्भात नासाने चारही अंतराळविरांचा पृथ्विवर परतल्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. यात स्पेस स्टेशनवरून परतलेले अंतराळवीर अभिवादन करताना दिसत आहेत. या व्हिडिओसोबत नासाने, “पृथ्वीवर परतल्यानंतर Crew9 ची पहिली झलक आपल्याला बघायला मिळत आहे! आता रिकव्हरी पथके ड्रॅगनमधून बाहेर येण्यासाठी क्रूला मदत करतील, ही दीर्घकाळाच्या मोहिमेवरून परतल्यानंतर सर्व क्रू सदस्यांसाठी असलेली एक मानक प्रक्रिया आहे,” असे लिहिले आहे.