खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे-शिंदेवाडी येथील जाधव पेट्रोल पंपासमोर असलेल्या कुलस्वामिनी वेल्डींग दुकानाच्या मागे सोमवारी सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या वणव्यात कार खाक झाली. येथील नगर परिषदेच्या अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांनी दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला.येथे वणवा लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक केंद्रातील फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, वाहनचालक विद्याधन पवार, सहाय्यक फायरमन प्रणय रसाळ, प्रणव घाग, जयेश पवार आदी तातडीने घटनास्थळी पोहोचले. रणरणत्या उन्हामुळे वणवा भडकला. या वणव्यात गॅरेजसमोर उभ्या असलेल्या कारने पेट घेतल्याने काही क्षणातच कार खाक झाली.