देवरुख :- येथील समाजसेविका वैदेही सावंत यांना महाराष्ट्र लोकविकास मंच तर्फे यावर्षीचा सामाजिक गौरव पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार धाराशिव कळंब येथे 23 मार्च रोजी वितरीत करण्यात येणार आहे.
सावंत यांनी वेगळ्यावेगळ्या माध्यमातून सामाजिक कार्य केलेले आहे. त्यांनी इसवी सन 2000 साली लहान मुलांची अंगणवाडी सुरू करून त्यांचे व्यक्तिमत्व विकास, सुसंस्कार यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. चक्रभेदी सोशल फौंडेशन संस्थेच्या माध्यमातून विधवा अनिष्ट प्रथा बंद करणे, पर्यावरण संरक्षण,जीवन कौशल्य कार्यशाळा, शिव्या मुक्त समाज अभियान इत्यादी नाविन्य उपक्रम त्या घेत आहेत.समाजातील निराधार गरजू गरीब महिलांना आधार देऊन त्यांचा हक्क मिळवून देण्याचं काम त्या प्रामाणिकपणे करत आहेत. त्याचबरोबर सम्पूर्ण टी स्टॉल सेटअप मोफत देऊन त्यांना रोजगाराची संधी त्या देत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र लोकविकास मंचने उत्कृष्ट कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा समावेश केला हे विशेष आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सामाजिक गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे . महाराष्ट्र लोकविकास मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ अण्णा तोडकर, भूमिपुत्र वाघ, रमाकांत कुलकर्णी, एम. एन.कोंढाळकर, बालाजी जाधव,पुष्कराज तायडे, ओम प्रकाश गिरी हे हा कार्यक्रम उत्कृष्ठ पणे पार पडावा म्हणून अहोरात्र कष्ट घेत आहेत. या कार्यक्रमाला राज्यभरातून सामाजिक कार्यकर्ते मान्यवर आणि संस्था प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत समाजासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभूतींचा सन्मान करण्याची परंपरा गेली अठ्ठावीस वर्ष चालत असल्याची माहिती विश्वनाथ तोडकर यांनी दिली आहे.वैदेही सावंत यांना मिळालेल्या सामाजिक गौरव पुरस्कारा बद्दल सर्व महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.