खेड: खेड-आंबवली मार्गावरील हुंबरीची वाडी येथे जात असताना २६ वर्षीय तरुणाची दुचाकी घसरून तो गंभीररित्या जखमी झाला. उपचार सुरू असताना डेरवण रुग्णालयात त्याचे निधन झाले. संकेत प्रदिप कदम, हुंबरी असे या तरुणाचे नाव आहे. संकेत कदम हा १ मार्च रोजी आपल्या ताब्यातील दुचाकीने हुंबरी वाडी येथे जात असताना दुचाकी घसरून त्यात तो जखमी झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू असताना १२ मार्च रोजी सायंकाळी ५ वा.च्या सुमारास त्याचे निधन झाले. या प्रकरणी येथील पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.