कुडाळ:-तालुक्यात पाट तिठा माउली मंदिर नजीक वाळूची वाहतूक करणारा डंपर आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक बसून शाळेतील मुलीचा जागीच मृत्यू झाला. काल सकाळी ७.३० वाजता हा अपघात झाला.
मनस्वी सुरेश मेथर (१५, रा. निवती) असे मृत मुलीचे नाव असून ती इयत्ता दहावीत शिकत होती. मनस्वी सकाळीच क्लाससाठी दुचाकीच्या मागे बसून पाट येथे जात असताना हा अपघात झाला. वाळू वाहतूक करणारा डंपर परुळे पाट मार्गे कुडाळच्या दिशेने येत होता. मोटरसायकल व डंपरची धडक बसून झालेल्या अपघातात मनस्वी डंपरच्या चाकाखाली सापडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. तीव्र अशा वळणाचा दुचाकीस्वाराला अंदाज न असल्याने दुचाकीची धडक डंपरला बसली. घटनेची माहिती मिळताच निवती पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला. निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. मनस्वी चा १७ मार्च रोजी दहावीचा शेवटचा पेपर होता.