मुंबई:- इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची ११ फेब्रुवारीपासून तर दहावीच्या विद्यार्थ्यांची २१ फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू आहेत. परीक्षा नेहमीपेक्षा १० दिवस अगोदर सुरू झाल्याने निकाल देखील १५ मेपूर्वीच जाहीर केला जाणार आहे.
त्याअनुषंगाने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांकडून तपासलेल्या उत्तरपत्रिकांचा दररोज बोर्डाचे अधिकारी आढावा घेत आहेत.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा केंद्रांबरोबरच पर्यवेक्षकांसाठी देखील सरमिसळ पद्धत अवलंबली. पण, त्याचा फार प्रभाव दिसला नाही.
या परीक्षेत भरारी पथकांनी नऊ विभागीय मंडळांतर्गत २०० हून अधिक विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे. अजून बारावीच्या विद्यार्थ्यांचा माहिती तंत्रज्ञान (आयटी) विषयाचा पेपर राहिला असून दहावीच्या विद्यार्थ्यांचेही दोन पेपर बाकी आहेत. १७ मार्च रोजी परीक्षा संपणार आहे.