रत्नागिरी:-विविध कार्यक्रमांसाठी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज सोमवारी १७ मार्च रोजी रत्नागिरीत येत आहेत.
रत्नागिरी पालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत रत्नदुर्ग येथे शिवसृष्टी निर्मिती (भाग – २) चे उद्घाटन उद्या सायंकाळी ६.३० वाजता रत्नदुर्ग किल्ल्यावरील शिवसृष्टी येथे होणार आहे.
वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत थ्रीडी मॅपिंग िग मल्टीमीडिया शो (खुले नाट्यगृह) या कामाचे उद्घाटन उद्या सायंकाळी साडेसात वाजता थिबा पॅलेस येथे होईल. या कार्यक्रमांसाठी पवार रत्नागिरीत येणार असून यावेळी अर्थ राज्यमंत्री योगेश कदम आणि पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, खासदार नारायण राणे, आमदार निरंजन डावखरे, भास्कर जाधव, किरण सामंत, प्रसाद लाड, ज्ञानेश्वर म्हा, शेखर निकम उपस्थित राहणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी केले आहे.