रत्नागिरी:- कुणबी समाजोन्नती संघाचे कार्यकारिणी सदस्य, ओबीसी बहुजन समाजाच्या विविध प्रश्नांची जाण असलेले समाजसेवक नंदकुमार मोहिते यांचे 6 मार्च रोजी निधन झाले. त्याबद्ल कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ग्रामीण शाखा रत्नागिरी यांच्या विद्यमाने रविवार 23 मार्च 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता कुणबी भवन जे. के. फाईल रम्य नगर रत्नागिरी येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
गरीब, शेतकरी व कष्टकरी समाजाच्या प्रश्नांचे गाढे अभ्यासक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल, श्रमिक विद्यालय व लोकनेते शामरावजी पेजे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय शिवार आंबेरेचे संस्थापक अध्यक्ष, सामाजिक राजकीय क्षेत्रातील गाढे अभ्यासक व्यक्तिमत्व संघर्ष नेते नंदकुमार मोहिते हे सर्व परिचित होते. 6 मार्च 2025 रोजी ह्रदय विकाराने त्यांचे निधन झाले. त्यांची शोकसभा रविवार 23 मार्च 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता कुणबी भवन जे के फाईल रम्य नगर रत्नागिरी रत्नागिरी येथे लोकनेते शामरावजी पेजे सभागृहात आयोजित केलेली आहे. या शोकसभा व आदरांजली अर्पण करण्यासाठी कुणबी, बहुजन, ओबीसी समाजातील सर्व स्तरातील बंधू भगिनी उपस्थित राहावे असे आवाहन कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई ग्रामीण शाखा अध्यक्ष सुर्यकांत गोताड, ग्रामीण शाखा रत्नागिरी अध्यक्ष रामभाउ गराटे यांनी केले आहे.