खेड:- उद्योग मंत्री उदय सामंत हे कोकण दौऱ्यावर आहेत. दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी गृह राज्य मंत्री योगेश कदम यांच्यासोबत चक्क खेडमध्ये मिसळ पार्टी केली. त्याचे झाले असे की, कोकणातील हे दोन्ही मंत्री कोकण दौऱ्यावर आहेत.
रविवारी सकाळी खेडमध्ये नवीन बसस्थानकाच्या इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रमासाठी उदय सामंत व योगेश कदम हे एकत्र उपस्थित राहणार होते. त्यापूर्वी त्यांनी खेडच्या जुन्या बसस्थानकासमोरील विजय उपहारगृह येथे मिसळ पाववर ताव मारला. आपल्या व्यस्त दिनचर्येत देखील त्यांनी मिसळचा आनंद लुटल्याने ही बाब चर्चेची ठरली.