रत्नागिरी ः पुण्यातून रत्नागिरीत खासगी वाहनाने दाखल झालेल्या वृद्धाला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. कंचनकांती मनोजकुमारघोष दस्तदार (वय ७३, रा. परगाना, कलकत्ता, पश्चिम बंगाल) अस मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १४) सकाळी साडेसातच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कंचनकांती दस्तदार हे गुरुवारी (ता. १३) पुण्यातून त्यांचा मुलगा, पत्नी व मित्रासह रत्नागिरीत नाचणे येथे दाखल झाले होते. अचानक त्यांना कफ व श्वसनाचा त्रास जाणवू लागला. उपचारासाठी त्यांनी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.