45 हजारांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी : संगमेश्वर बाजारपेठेत बेकायदेशिरपणे जुगार खेळणार्या 5 जणांविरोधात संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 12 मार्च रोजी दुपारी 3.35 वा. सुमारास करण्यात आली.
गौरव शेखर सुर्वे (39), राकेश शिवराम घाग (46), गौसिध्दीन हुसेन कापडी (61), यासिन कासम सनगे (64), सज्जाद हमीद शाह (48) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पोलिस काँस्टेबल गिरीजाप्पा धोंडीराम लोखंडे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार,यातील गौरव व राकेश हे दोघे लोकांकडून रक्कम स्विकारुन बेकायदेशिरपणे मटका जुगार खेळ चालवत होते. तर अन्य त्याठिकाणी बेकायदेशिरपणे मटका जुगार खेळत असताना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण 45 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.