रत्नागिरी ः मिरजोळे-बौद्धवाडी येथे चोरटी हातभट्टीची दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ५५० रुपयांची पाच लिटर दारु जप्त करण्यात आली. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संदेश गणपत जाधव (वय ५२ रा. मिरजोळे-बौद्धवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १४) रात्री सव्वानऊच्या सुमारास मिरजोळे-बौद्धवाडी येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयित विनापरवाना हातभट्टीची दारु विक्री करत असताना सापडला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल उमेश पवार यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.