रत्नागिरी ः शहरात शिमगोत्सवाची धूम सुरु असताना चर्मालय ते चंपक मैदान, मुरुगवाडा या सार्वजनिक ठिकाणचा उपयोग करुन मद्यपान करणाऱ्या दोन संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलेश वसंत ओर्पे (वय २८, रा. उद्यमनगर, रत्नागिरी) व नंदकुमार चंद्रकांत मयेकर (वय ५६, रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. या घटना शुक्रवारी (ता. १४) सायंकाळी पावणेसहा ते रात्री आठच्या सुमारास चर्मालय ते चंपक मैदान येथील झाडाखाली व मुरुगवाडा येथे निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना आढळले. या प्रखरणी पोलिस कॉन्स्टेबल अमित पालवे व पोलिस हवालदार निलेश कांबळे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.