बँकेसमोरील बेशिस्त पार्किंगचा प्रश्न सोडवला
राजापूर : राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष संजय ओगले यांनी पदभार स्वीकारताच कामाचा धडाका सुरू केला. आपल्या कामाची चुणूक दाखवून त्यांनी कार्य तत्परतेचे दर्शन घडवले आहे.
राजापूर अर्बन बँकेच्या आवारात बेशिस्त वाहन पार्किंग करण्यात येत होते. याबाबत वारंवार तक्रारी करूनहीं यावर कोणतीही उपाययोजना करण्यात येत नव्हती, मात्र राजापूर अर्बन बँकेचे नूतन अध्यक्ष यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारताच बँकेच्या समोरील आवारात असलेल्या बेशिस्त पार्किंगला आवर घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी बँकेसमोरील जागेत लावलेली दुचाकी वाहने बाजूला हटवण्यास सांगून तेथील जागा मोकळी केली आहे. त्यामुळे आता बँकेत येणाऱ्या जाणाऱ्याना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नसून ज्येष्ठ नागरिकांना बँकेमध्ये किंवा इतरत्र व्यवस्थित फिरता येणार आहे. त्यांच्या या धडाकेबाज कामाने अर्बन बँकेच्या यशस्वीतेची नांदी प्रथमच सभासद नागरिकांना पाहायला मिळाली. त्यांच्या या कार्य तत्पर कामाचे कौतुक होत आहे. भविष्यात बँकेला ते यशस्वी शिखरावर नेतील असा आशावाद येथील सभासद, हितचिंतक यांच्याकडून व्यक्त होत आहे.