राजापूर शहरामध्ये होळी उत्सवानिमित्त घडलेला प्रसंग हा वेदनादायक होता
आगामी काळात होणाऱ्या होळी उत्सव, रमजान महिना, ईद, तसेच शिवजयंती आदी सण शांततेने व सौहार्दाने साजरे करावेत
राजापूर:- शहरात घडलेल्या प्रसंगावर माजी विधान परिषद आमदार ॲड. सौ. हुस्नबानूयू खलिफे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. १२ मार्च रोजी राजापूर शहरामध्ये होळी उत्सवानिमित्त घडलेला प्रसंग हा वेदनादायक होता. तथापि पोलिस प्रशासन व हिंदू मुस्लिम समाजातील प्रमुख मंडळींनी पुढाकार घेऊन घटनाहोळी उत्सव, रमजान महिना, ईद, तसेच शिवजयंती हाताळली आहे. त्यांचे मी आभार मानते. तथापि तदनंतर प्रसिद्ध झालेल्या वृत्त, सोशल मिडिया पोस्ट या सगळ्या विसंगत होत्या. त्यामुळे मी असे आवाहन करते जी घटना घडली ती घडून गेली. आता कुणीही हिंदू मुस्लिम बांधवांनी काहीही अनुचित सोशल मीडियावर पोस्ट टाकू नये. तसेच समाजात शांतता व सलोखा ठेवावा. आगामी काळात होळी उत्सव, रमजान महिना, ईद, तसेच शिवजयंतीचा उत्सव होणार आहे. तरी सर्वांनी शांततेने व सौहार्दाने सर्व सण उत्सव साजरे करावेत. अशी प्रतिक्रिया माजी विधान परिषदेच्या आमदार ॲड. सौ. हुस्नबानू खलिफे यांनी व्यक्त केली आहे.