राजापूर : संस्कृतीची ओळख व त्याची जाण नव्या पिढीला व्हावी तसेच काळाच्या प्रवाहात कालबाह्य होऊ पाहणाऱ्या कोकणातील परंपरा सणांचे व कलेचे जतन व्हावे या उद्देशाने राजापूर प्रतिष्ठानच्या वतीने उद्या 16 मार्च रोजी भव्य पालखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा 16 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून परमपूज्य संजय सिंह पाटणकर (सरकार) गगनगिरी महाराज यांचे नातू तसेच परमपूज्य उल्हासगिरी महाराज मठाधिपती कोणी कोंडीवळे, सद्गुरु ह. भ. प विश्वनाथ गोसावी त्यांची उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन राजापूर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन पाडावे तसेच कार्याध्यक्ष प्रकाश कातकर, सचिव राजू काशीकर खजिनदार गोपाळ गोंडाळ यांनी केले आहे.