रत्नागिरी : तालुक्यातील मौजे टेंब्ये येथील कुमारी सायली सिद्धार्थ पवार हिने सन २०१८ ते २०२५ या शैक्षणिक वर्षात मुंबई विद्यापीठाच्या, हिंदी विभागातून मुन्शी प्रेमचंद आणि नारायण हरी आपटे यांच्या कादंबऱ्यांतून व्यक्त झालेल्या स्त्री जीवनाच्या विविध आयामांचा तुलनात्मक अभ्यास या विषयात विद्यावाचस्पती (Doctorate) (PHD) पदवी प्राप्त केली आहे. सायली पवार ही टेंब्ये गावच्या इतिहासातील पहिली विद्यावाचस्पती (Doctorate) (PHD) पदवी मिळवणारी महिला ठरली आहे. त्याबद्दल तिचे अभिनंदन होत आहे.
सायली हिने जॉब सांभाळून आपल्या विद्यावाचस्पती(Doctorate) (PHD) चा अभ्यास करून विद्यावाचस्पती (Doctorate) (PHD) पदवी संपादन केली.
सायली हिच्या उतुंग यशामागे गुरु डॉ. रतन कुमार पांडे सर आणि नीरज यांचे ही आर्थिक पाठबळ मिळाले व तिची मोठी बहीण सौ. शिल्पा पवार डोळस ही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती तसेच आई वडील यांचे शैक्षणिक क्षेत्रात नेहमी प्रोत्साहन मिळाले असे ती सांगते.