संगमेश्वर:- श्रीमती कमळजाबाई पांडुरंग मुळ्ये हायस्कूल व क. महाविद्यालय कोळंबे, ता. संगमेश्वर या विद्यालयाला सौ. रश्मी विवेक देशमुख यांनी वडिलांचे स्मरणार्थ दोन संगणक संच व एक प्रिंटर भेट देण्यात आला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण मिळावे हा उदारहेतू आहे. त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रविंद्र मुळ्ये यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्था सदस्य श्री. प्रथमेश मुळ्ये, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. चव्हाण सर तर आभार श्री. जोशी सर यांनी मानले.