चिपळूण :-येथील नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना बुधवार दिनांक 12 मार्च रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास चिपळूण-गुहागर बायपास रोड येथे घडली. साहिल जयंत कासार ( 25 ) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साहिल हा आपल्या ताब्यातील स्पोर्ट्स बाईकने गुहागर बायपास मार्गावरून रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घरी येत होता. मात्र स्पोर्ट्स बाईकचा वेग त्याला आवरला नाही आणि एका वळणावर त्याची बाईक रस्त्याकडेच्या मोरीवर जोराने आदळली. यात साहिलला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कळतात अनेकांनी तिकडे गाव घेतली. साहिलला उपचारासाठी तातडीने लाईफ केअर रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. परंतु तपासाअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. शिमगोत्सवामध्ये कासार कुटुंबियांवर झालेल्या आघाताने हळहळ होत आहे.