चिपळूण : मद्यधुंदीत असलेल्या ट्रक चालकाने एका कारला धडक दिल्याची घटना सोमवारी कुंभार्ली घाटात घडली. या प्रकरणी त्या मद्यपी ट्रक चालकावर अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय पांडुरंग वारके (२५, बेळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या बाबतची फिर्याद नामदेव महादेव अवताडे (३९, सोलापूर) यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय वारके त्याच्या ताब्यातील ट्रक गुहागर-विजापूर मार्गाने बेळगाव येथे घेऊन जात होता. असे असताना तो कुंभार्ली घाटात असलेल्या पोलीस चेकपोस्टपासून ६ कि.मी. अंतरावरील एका वळणावर आला असता त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने नामदेव अवताडे यांच्या कारला धडक दिली. त्याने मद्यप्राशन केल्याचे आढळून आले. या अपघातप्रकरणी दत्तात्रय वारके याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.