संगमेश्वर/दिनेश आंब्रे:-श्रीमती कमळजाबाई पांडुरंग मुळ्ये हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कोळंबे येथे ११ मार्च रोजी प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मार्गदर्शन करताना तेजस पटेल म्हणाले की, विद्यार्थ्यांनी जीवनातील शिस्त, चारित्र्य उत्तम ठेवावे, शिक्षक व कुटुंबाचा आदर करावा, भयमुक्त जीवन जगावे आणि नेहमी पुढे जाण्याची हिंमत ठेवणे आवश्यक आहे.
यावेळी श्री तेजस पटेल यांनी विद्यार्थ्यांना सैन्य भरतीविषयी तसेच सैन्यातील शिस्त व मूल्यांचे महत्त्व सांगितले. सैनिकांना देशसेवा करताना वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये आणि विविध भौगोलिक परिस्थितीत कसे रहावे व लढावे लागते, याचे व्हिडिओ क्लिपद्वारे मार्गदर्शन केले. त्यांनी स्वतःचे अनुभव कथन करून विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
या मार्गदर्शन शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाची प्रेरणा निर्माण झाली.
सदर कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष नयन मुळ्ये , संस्था सदस्य प्रथमेश मुळ्ये , सामाजिक कार्यकर्ते संदेश जोशी, माजी मुख्याध्यापक संजय मुळ्ये , गुरुकुल वसतीगृहाचे अधीक्षक सदानंद जुवेकर आणि शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र मुळ्ये सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन खांबे सरांनी केले.