चिपळूण : संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला श्री देव सोमेश्वर आणि श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या शिमगोत्सवातील शेरणे कार्यक्रम १३ मार्च रोजी सायंकाळी ५ नंतर सुरू झाला. पेठमाप वाशिष्टी नदीच्या तीरावरती भक्तांचा अलोट जनसागर जमला होता. यावेळी देवीने लपवलेली शेरने शोधून काढत देवीने आपला महिमा दाखविला आहे. या कार्यक्रमाला सेलिब्रिटींनी सुद्धा हजेरी लावली होती.
देवी करंजेस्वरीचे पेठमाप हे माहेर असून आपल्या माहेरात होणारा हा कार्यक्रम भाविकांसाठी जिव्हाळ्याचा मानला जातो. दरवर्षी पेठमाप येथे वाशिष्टीच्या तीरावर पिवळ्या हळदीचा फडक्यात नारळ बांधून त्याच्यावर नाव टाकून ते शिरणे लपवले जाते. त्यानंतर देवी हे शिरणे शोधून काढते. एक लांबलचक काठी त्या काठीला वरती मोरपिसांचा गुच्छ बांधलेला असतो. एक व्यक्ती काठी घेऊन शरणे शोधण्याचे काम करतो. मागून देवींच्या पालख्या आणि भक्त असतात. शहरातील गोवळकोट पेटमाप येथील ग्रामस्थांची श्रद्धास्थान असलेल्या आदिशक्ती श्री करंजेस्वरी देवीचा महिमा वर्षानुवर्षी सर्व दूर पसरत आहे. विविध ठिकाणाहून भाविक या ठिकाणी शेरणे लपवण्यासाठी येतात. मनात नवस बोलून लपवलेली शेरणे शोधून काढली तर भाविकांचे मनोकामना पूर्ण होते अशी श्रद्धा आहे. यावर्षी 130 शेरणे लपवण्यात आली होती. या शरणे काढण्याच्या कार्यक्रमांमध्ये अनेक सिने कलाकार, राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, उद्योजक, शासकीय अधिकारी नवस लावतात. त्यामुळे या कार्यक्रमाला अलोट गर्दी होते.
शेरणे शोधणे कार्यक्रमाला सिनेतारका उपस्थित
कार्यक्रमाला मराठी अभिनेत्री रूपाली भोसले आणि सायली संजीव या दोघीनी उपस्थिती दर्शवली होती. यापैकी सायली संजीव अभिनेत्रीने सुद्धा आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी शेरने लपवले होते आणि ते शेरनी देवीने शोधले होते. त्यामुळे तिला अतिशय आनंद झाल्याचे तिने सांगितले. हा सोहळा पाहण्यासाठी आपण दरवर्षीच या ठिकाणी येऊ असे तिने आपल्या बोलताना सांगितले.
ढोल ताशाच्या गजरात शोधली शेरने
पेठ माप वरून शेरणे शोधणेच्या जागेवरती देवी करंजेस्वरी आणि श्रीदेवी सोमेश्वर यांच्या पालख्या ढोल ताशाच्या गजरात आल्यानंतर अलोट गर्दी झाली. पाच वाजल्या नंतर खऱ्या अर्थाने शेरणे शोधणे कार्यक्रमाला सुरुवात झाली. बघता बघता देवीने निम्म्याहून जास्त शरणे शोधून काढली. यावर्षी १३० शेरणे लपवण्यात आली होती. यावेळी अनेक ढोल पथक ढोल वाजवण्याचा कार्यक्रम करत होते. अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रम आणि ढोलांचा गजर यामुळे वातावरण भक्तीमध्ये झाले होते . *महाबळी हनुमानाची व्यक्तिरेखा ठरली खास आकर्षण* यावर्षी देवीचे शेरणे शोधणे कार्यक्रमांमध्ये पालखीसोबत महाबळी हनुमानाची वेशभूषा अतिशय आकर्षक ठरली आहे. ती पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. बाहुबली हनुमंतरायासाठी खास एक उंच रंगमंच बनवला होता. त्यावर हनुमंत उभा राहून सर्वांना आशीर्वाद देत होता .या ठिकाणी हनुमान चालीसा सुद्धा लावली गेली होती. शेरणे कार्यक्रमानंतर देवस्थानच्या दोन्ही पालख्या गोवळकोटच्या दिशेने रवाना झाल्या. त्यानंतर शुक्रवारी १४ मार्च रोजी सकाळी सात वाजता गोवळकोट सहाने जवळचा होम लागून पालख्या पुन्हा सहाने दर्शनसाठी विराजमान होणार आहेत. या कार्यक्रमासाठी श्रीदेव सोमेश्वर श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थानाणे उत्तम नियोजन केले होते. या ठिकाणी पोलीस प्रशासनाने सुद्धा चांगलं सहकार्य केले.